राजगड किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; २० ते २५ जण जखमी

पुणे – राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ला परिसराजवळ रविवारी किल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या २० ते २५ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात काही पर्यटक हे जखमी झाले. या पर्यटकांना बारामतीहून आलेल्या एका पर्यटकांच्या गटाने व भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या टीमने वेळेत मदत केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक हे किल्ल्यावर शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या आनंद लुटण्यासाठी आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे बालेकिल्लाजवळ जमले होते. यावेळी या ठिकाणी असलेल्या मधमाशांच्या पोळ्यासोबत काहींनी धक्का लावण्याने मधमाश्यांनी पर्यंतकांनवर हल्ला केला. मधमाशा पर्यटकांना डंख मारू लागल्याने गडावर असलेल्यांची धावपळ सुरू झाली. अनेकजण मदतीसाठी ओरडत होते. या घटनेमुळे दहशत आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




