भाडेकरूंची माहिती पोलीसांना सादर न करणा-या घरमालकां विरोधात लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे कारवाई..!

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ (३) प्रमाणे घरमालक यांनी भाडेकरु ठेवताना तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीततेबाबत दक्षता घेणेकरीता सदरची माहिती पोलीसांना कळविणे बंधनकारक असले बाबत आदेश काढलेले असुन त्याबाबत पोलीस विभागातर्फे वेळोवेळी प्रसार माध्यमाव्दारे त्याची प्रसिध्दी करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात भाडेकरु बाबत माहिती तसेच हद्दीमधील हॉटेल, लॉजेस मर्मस्थळे व गर्दीचे ठिकाणी भेटी देण्यासाठी वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टेशन स्तरावर दोन पथके निर्माण करण्यात आली होती. भाडेकरुची माहिती घेणारे पथकास तीन घरमालक यांनी भाडेकरु ठेवल्यानंतरही त्याची माहिती पोलीसांना कळविली नसले बाबत माहिती प्राप्त झाल्याने सदर पथकाने १) दिलीप रैजिनाथ तकीक, वय-३३, रा. सुतारपट्टी, गुजरवस्ती, कवडीपाट, कदमवाक वस्ती, हवेली, पुणे. २) सरोजा प्रताप जाधव, वय ४९ वर्षे, रा. लेननं. ०४, गणराज पार्क, कवडीपाट, कदमवाक वस्ती, हवेली, पुणे. ३) शिवाजी सुदाम कांबळे, वय ६० वर्षे, रा. स्वामी विवेकानंदनगर राधाई मच्छि मार्केट जवळ, कदमवाकवस्ती, पुणे यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती पोलीसांना कळविली नसल्या बाबत सांगीतले आहे. त्यावरुन त्यांचेविरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप-आयुक्त, परि- ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे शहर, श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार रवि आहेर, रामदास मेमाणे, प्रदिप क्षिरसागर, केतन धेंडे, प्रशांत नरसाळे, अक्षय कटके महिला पोलीस अंमलदार राणी खामकर यांचे पथकाने केली आहे.




