मॉर्निंग वॉक करणा-या महिलेचे दुचाकीवरुन येवुन मंगळसुत्र हिसकावणा-या गुन्हेगारास १२ तासात केले जेरबंद..!

दि.१६/०५/२०२५ रोजी सकाळी फिर्यादी हिलटॉप सोसायटी, सिध्दीविनायक मंदिरा जवळ धनकवडी पुणे येथे सार्वजनीक रोडवर फिर्यादी महिला मॉर्निंग वॉक करीत असताना. एका दुचाकी गाडीवरून एक अनोळखी इसमाने त्यांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडून चोरून नेले त्याबाबत अनोळखी चोरटया इसमाविरूध्द सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१९०/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०४,३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गुन्हयाचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील व पोलीस अंमलदार असे करीत असताना सदर घटनेच्या अनुषंगाने सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यावरुन गुन्हा केलेला आरोपी हा स्विगी कंपनीचा डिलवरी वॉय म्हणनु फिरत असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा करणारा इसम हा गणेश चौक, आंबेगाव पठार, पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत असुन त्याने अंगामध्ये काळे पिवळे रंगाचा हाफ बाहीचा टी शर्ट व निळे रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे. सदरची बातमी वरिष्ठांना कळवुन लागलीच स्टाफसह बातमीचे ठिकाणी जावुन पाहता बातमीतील वर्णनाचा इसम सदर ठिकाणी उभा असलेला दिसला. त्यास संशय येताच तो तेथुन पळून जावु लागल्याने त्यास सोबतचे स्टाफचे मदतीने थोड्याच अंतरावर पकडुन ताब्यात घेवुन त्यांच्से नावे पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) अमोल किसन नाकते वय २७ वर्षे सध्या रा. समता कॉलनी, प्रेरणा शाळेमागे, गणेश चौकाजवळ आंबेगाव पठार पुणे मुळ रा.मु.पिंपरी पोस्ट गुंजवणे ता. वेल्हा जि.पुणे असे असल्याचे सांगीतले.
त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता सदर गुन्हाची कबुली त्याने दिल्याने सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.१९०/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०४,३०९ (६) हा गुन्हा उघडकीस आला असुन सदर आरोपी कडुन एकुण ९०,०००/- रू. किंमतीचे २ तोळे सोने व गुन्हा करतेवेळी वापर केलेली एक दुचाकी गाडी ६०,०००/- रु.किं.ची व सदर सोने गहाण ठेवुन मिळालेली रक्कम १,००,०००/-रुपये असा एकुण २,५०,०००/-रु. किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. मा. न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक २०/०५/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली असुन अधिक तपास सहकारनगर पोलीस ठाणेकडील सपोनि सागर पाटील हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परि २, पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोलीस फौजदार बापु खुटवड, पोलीस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले, प्रदिप रेणुसे, महेश भगत, बजरंग पवार, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अमित पदमाळे, मारोती नलवाड यांनी केली आहे.




