अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का ग्राहकांना पुरविणा-या हॉटेल चालक व स्टाफ यांचेवर केली कारवाई..!

दि.१०/०५/२०२५ रोजी वानवडी पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक धनाजी टोणे व स्टाफ असे वानवडी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार अमोल पिलाने व अभिजीत चव्हाण यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन, सुपर मॉल दुसरा मजला, साळुंखे विहार रोड, वानवडी पुणे या हॉटेल मध्ये अवैधरित्या हुक्का चालु आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी ती वरिष्ठ पोलीस निरिक्षक वानवडी पोलीस ठाणे पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी खात्री करुन कायदेशीर कारवाई करणेबाबत सुचित केले.
त्याप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक धनाजी टोणे व तपास पथकातील स्टाफ असे मिळुन वर नमुद दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन, सुपर मॉल दुसरा मजला, साळुंखे विहार रोड, वानवडी पुणे या हॉटेल मध्ये अचानकपणे छापा टाकुन चेक केले असता, सदर ठिकाणी १) नारायण मगर थापा, वय ३३ वर्ष रा. शिवनेरीनगर, लेन नं.१५ कोंढवा, पुणे, २) चंदनकुमार श्रीतेवन राय, वय २२ वर्षे, रा. दि स्पाईसी फ्लोअर कॅफे अॅण्ड क्लाऊड किचन, सुपर मॉल दुसरा मजला, साळुंखे विहार रोड, वानवडी पुणे ३) इनायत मजिद सल्ला, वय ५२ वर्षे रा. भाग्योदयनगर, कोंढवा, पुणे व ४) जावेद मलिक शेख, वय ४२ वर्षे रा. पूना कॉलेज समोरील वस्ती, गोळीबार मैदान, कॅम्प, पुणे यांनी तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर व त्यासाठी लागाणारे हुक्का साहित्य हॉटेलमध्ये जवळ बाळगुन ते हॉटेलमध्ये आलेल्या गि-हाईकांना विक्री करताना मिळुन आल्याने सदरचा एकुण ३२१५/-रु. किंमतीचा तंबाखुजन्य हुक्का व फ्लेवर तसेच त्याचे साहीत्य हे पोलीस उप-निरीक्षक धनाजी टोणे व स्टाफने पंचांसमक्ष पंचनाम्याने जागीच जप्त करुन ताब्यात घेतले असुन, नमुद इसमांवर गु.र.नं १९८/२०२५ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४(अ), २१ (अ) या कलमान्वये वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदर इसमांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३५ प्रमाणे नोटीस देण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास हा पोलीस उप-निरिक्षक धनाजी टोणे हे स्वतः करीत आहेत.
सदरची कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि.०५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सत्यजित आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गोविंद जाधव, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, धनाजी टोणे, सपोफौ रमेश साबळे व पोलीस अंमलदार दया शेगर, अमोल पिलाणे, अभिजित चव्हाण, अमोल गायकवाड, बालाजी वाघमारे, गोपाळ मदने, विष्णु सुतार, यतीन भोसले व सोमनाथ कांबळे यांचे पथकाने केली आहे.




