मसाज सेंटरचे नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असलेल्यांवर केली कारवाई..!

बाणेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मसाज सेंटरचे नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या गोपनीय माहीती प्रमाणे दिनांक दि.१२/०५/२०२५ रोजी “२४ थायस्पा.” शॉप नं ६०४, ७४ टाऊन बिल्डींग, युनियन बँक शेजारी बाणेर पुणे येथे बनावट ग्राहक पाठवुन खात्री करुन छापा टाकला असता सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय चालु असल्याचे अढळुन आल्याने छापा टाकुन कारवाई करण्यात आली त्यामध्ये स्पा मॅनेजर १) ज्योतीदेवी देवनारायण घोष वय ३८ वर्षे, रा. स्मशानभुमीजवळ गहुंजे, पुणे २) अमनगिरी गोस्वामी, वय-२३ वर्षे, रा फ्लॅट नं ४०५, टेराग्रिन्स, मुकाई चौक, रावेत पुणे ३) स्पा मालक ४) जागा मालक यांचेवर बाणेर पोलीस ठाणे कडील गु.र.नं. ९०/२०२५ अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, व बी.एन. एस. कलम १४३, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयातील स्पा मॅनेजर ज्योतीदेवी देवनारायण घोष व अमनगिरी गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.
यातील आरोपी पौकी अ.क्र.०१, अ.क्र.०२ व अ.क्र.०३ यांनी यातील ०२ पिडीत महिला यांना वेश्या व्यवसाया करिता प्राप्त करुन घेऊन पैशांचे अमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करुन स्पा च्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेऊन तसेच अ.क्र. ०४ याने आपली स्वतःच्या मालकीची जागा वेश्या व्यवसायासाठी उपलब्ध करुन देवुन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागवित असताना मिळून आले म्हणुन सरकारतर्फे सदर इसमांविरुध्द अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधकायदा १९५६ चेकलम ३,४.५. व बी.एन.एस. कलम १४३,३ (५) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. कोणत्याही अस्थापनेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणा-या विरुध्द कारवाईच्या मोहीमे मध्ये व्यवसायाचे संबधीत व्यवसाय चालक तसेच वेश्या व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्या जागेचे मालक याचेवरही कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परि.४, पुणे शहर श्री. हिमंत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, श्री. विठ्ठल दबडे यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, म. पोलीस उप-निरीक्षक दिपाली पाटील, पोलीस उप-निरीक्षक पोलीस उप निरीक्षक रुपेश चाळके, तसेच पोलीस अमलदार भोरे, शिंगे, आहेर, काळे, चालक बर्गे, सोने, माळी, बागुल, सोनटक्के, बोराटे, खुडे, मपोशि पाटील, यांनी केली आहे.




