स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड व पुणे रेल्वे स्टेशन परिसरामधुन प्रवाशांचे मोबाईल चोरीकरणा-या चोरट्यांना केले जेरबंद..!

स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील स्वारगेट एस टी स्टैंड व पी एम पी एम एल बस स्टॉप येथे चोरीच्या घटना अधुन मधुन घडत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. युवराज नाद्रे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनकडील पोलीस उप-निरीक्षक अशोक पाटील, पोलीस अंमलदार ठोंबरे, कुडाळकर यांना सुचना देवुन सदर मागाल सकाळी गर्दीचे वेळी गुन्हे प्रतिबंधक गस्त करणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार दि. २८/०४/२०२५ रोजी सकाळी ०६/०० वा चे सुमारास सदर पथक गस्तीवर असताना दोन इसम स्वारगेट पी.एम.पी.एम एल बस स्टॉप येथे प्रवाशांच्या गर्दीत संशयीतरित्या वारंवार फिरत असल्याचे दिसुन आले त्यांचे हालचालीवरुन त्याचेवर अधिक संशय बळावल्याने सदर पथकाने त्यांना हटकले असताते पळून जावु लागल्याने त्यांना स्टाफचे मदतीने जागीच ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाय पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता १) तुषार अविता लोखंडे चरा २० वर्षे रा. गल्ली नं ३ पाटील इस्टेट शिवाजीनगर पुणे. २) गणेश संजय पोळके वय २३ वर्षे रा.गल्ली न ३ पाटील इस्टेट शिवाजीनगर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यानंतर इसम नामे तुषार लोखंडे याचे ताब्यातील सॅकची पडताळणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या वर्णनाचे व वेगवेगळ्या कंपन्याचे एकुण ०६ मोबाईल फोन मिळून आले.सदर मोमाईल फोनबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना अधिक चौकशीकामी स्वारगेट पोलीस ठाणे येथे आणले तद्नंतर तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे व तपास पथकातील पोलीस अंमलदार अश्रूया मोराळे, प्रशांत टोणपे व इत्तर अंमलदार यांनी सदर आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांचे ताब्यात मिळालेले ०६ मोबाईल फोन व आणखीन ०६ मोबाईल फोन असे एकुण १२ मोबाईल फोन हे स्वारगेट बस स्टॅन्ड परिसर, पुणे स्टेशन व शिवाजीनगर बस स्टॅन्ड येथुन गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे चोरी केले असल्याचे सांगितले. त्यावरुन स्वारगेट पोलीस स्टेशनकडील अभिलेखाची पडताळणी केली असता त्यातील ०१ मोबाईल फोनबाबत स्वारगेट पोलीस स्टेशन गुरजि.न. ११५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडुन तपासा दरम्यान एकुण १,८०,०००/- रुपये किमतीचे वेगवेगळया वर्णनाच व कंपन्यांचे एकुण १२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. प्रविणकुमार पाटील मा. पोलीस उप-आयुक्त, परि २. पुणे शहर, श्रीमती स्मार्तना पाटील मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विकास भारमळ व तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, अशोक पाटील, पोलीस अंमलदार अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, ठोंबरे, कुडाळकर, प्रशांत टोणपे, सुजय पवार, दिपक खंदाड, फिरोज शेख, हनुमंत दुधे, रमेश चव्हाण, संदीप घुले, यांनी केली आहे.




