मोक्या मधील ०३ महिन्यांपासुन पसार झालेला आरोपीस पोलीसांनी केले जेरबंद..!

विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ४८१/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३०८ (४),१८९(२),१९१(२),१९१(३), १९०,३५२,३५१ (३) भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), क्रिमीनल लॉ अमेन्डमेट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१) (फ), ३ (२), ३ (४) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे फिरोज कुतुब खान वय २६ वर्ष रा. रुम नंबर ८१० सी विंग, एसआरए झोपडपट्टी राजीवनगर विमाननगर पुणे हा दाखल गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केल्यानंतर पसार झाला होता. मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे व विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय संकेश्वरी यांनी नमुद आरोपीचा तात्काळ शोध घेणे बाबत आदेशित केले होते. तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय चंदन व तपास पथकातील स्टाफ असे फिरोज खान याचे मागावर होते. आज रोजी फिरोजखान हा एसआरए बिल्डींग येथे येणार आहे अशी बातमी पोलीस अंमलदार नाईक व पिसाळ यांना मिळाली होती. सदर बातमीचे अनुषंगाने एसआरए बिल्डींग, विमानगर पुणे या ठिकाणी तपास पथकातील कर्मचारी यांचेसह सापळा लावण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी फिरोजखान हा एसआरए बिल्डींग येथे आला असता त्यास तपास पथकाचे स्टाफने सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले आहे. तसेस त्यास गुन्ह्याचे पुढील तपास कामी मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे समक्ष हजर करण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप-आयुक्त परि ०४ पुणे शहर, श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय संकेश्वरी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आशालता खापरे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. विजय चंदन व पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु क-हे, यांचे पथकाने केली आहे.




