बनावट नोटा छापणा-या टोळीचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडील सायबर पथकाकडुन पर्दाफाश. मोठ्या प्रमाणात बनावट नोटा व नोटा छापण्याचे साहित्य जप्त..!

बँकेचे सीडीएम मशिन मध्ये २०० रूपये दराच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आले आहेत. अशा फिर्याद वरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गु.र. नं. ५९/२०२५ भा.न्या.स कलम १७८, १७९, १८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस तपास पथक गठीत करून त्वरीत तांत्रिक विश्लेषण कले. आरोपीताचा शोध घेवून आरोपी नामे मनिषा स्वनिल ठाणेकर, नागपुर चाळ, येरवडा, पुणे, भारती तानाजी गवंडरा मोर्या गोसावी, राजपाल सी १०, केशवनगर, चिचवड, सचिन रामचंद्र यमगर, वय ३५, रा गहुंजे, पुणे, यांना दि १८/०४/२०२५ रोजी अटक करण्यात आले. अटक आरोपीताकडे कसून तपास केला असता नमुद आरोपीतांनी सदरच्या नोटा कोल्हे नावाच्या व्यक्तीकडून प्राप्त केले असल्याचे समजले. कोल्हे नावाच्या इसमाबाबत अधिक माहिती प्राप्त केले असता त्याचे नाव नरेश भिमप्पा शेटटी रा लोहगाव, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले असता सदर इसमाचे घरी छापा टाकला असता त्याचे घरामध्ये २००/- रुपये दराचे बनावट नोटांचे २० बंडल ज्याचे बजारातील मुल्य ४,००,०००/- रुपये, ख-या नोटा २,०४,०००/- रुपये, नोटा छापण्याचे प्रिटंर, ५००/- रुपये दराच्या ए४ साईजचे १,११६ कागदांवर प्रत्येक कागदावर ४ नोटा या प्रमाणे एकुण २,२३२ प्रिंट केलेल्या नोटा ज्याचे बाजाराती मुल्य २२,३२,०००/- रुपये, नोटा प्रिंट करण्यास वापरण्यात येणारी शाई, नोटा छापण्याचे कोरे कागद व इतर साहित्य तसेच नमुद आरोपीचे कार क्रं एमएच १२ डब्ल्यु के ३७६१ मधुन बनावट २००/- दाराच्या ६४८ नोटा व तसेच ५०० रुपये ३ बनावट नोटा ज्यांची बाजारातील किंमत १,३९,१००/- रुपये जप्त केले. या गुन्हयातील इतर आरोपी नामे भारती गवंड यांच्या कडून २००/- रुपये दराच्या ६०,०००/- रुपये किंमतीच्या नोटा आरोपी मनिषा ठाणेकर (पाटील) यांचे कडून बनावट २००/- दराच्या २०,०००/- रुपयांच्या नोटा, सचिन यमगर यांचे कहुन २००/- दराच्या २०,०००/- रुपयांच्या नोटा, असे साहित्य जप्त केले. आरोपी नामे नरेश शेटटी यांचे अधिक तपास केले असता सदर गुन्हयामध्ये त्यास आरोपी प्रभू गुगलजेडडी याने मदत केली असल्याचे तांत्रिक विश्लेषनावरून त्यास देखिल अटक करण्यात आली. सदर आरोपी कडून २००/- दराच्या ३,०००/- रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयातील सर्व आरोपीतांचा दि-२९/०४/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी रिमाड घेण्यात आले असून आज पर्यंत गुन्हयातील सर्व आरोपीताकडून एकूण २८,६६,१००/- रुपयांचे २०० व ५०० रुपयांचे बनावट नोटा व २,०४,०००/- रुपयांच्या ख-या नोटा व इतर साहित्य गुन्हयात वापरलेल्या कारसह जप्त करण्यात आले आहे. गुन्हयातील नोटा छापण्यास वापरण्यात आलेले लेपटॉपमालक व तसेच इतर आरोपीतांचे नावे निष्पन्न झाले असून त्यांचा कसोशीने शोध सुरू आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त सो, श्री. रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त सो, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ-१, श्री. संदिपसिंह गिल्लन, मा. सहा पोलीस आयुक्त सो, श्री. साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी, मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, सहा पोलीस निरीक्षक के बी डाबेराव, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार नलिनी क्षिरसागर, आदेश चनबादी, तेजस चोपडे, गणेश जाधवर, श्रीकृष्ण सांगवे, प्रविण दडस, रुचिका जमदाडे, स्वालेहा शेख (एटीसी) यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page