गुलाबी जॅकेट आणि गुलाबी बस; विधानसभेनिमित्त अजित पवारांची जन सन्मान यात्रा

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने राज्यात जनसन्मान यात्रेची सुरुवात दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून गुरुवारपासून होत आहे. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या यात्रेत आदिवासी शेतकरी मेळावा, द्राक्ष उत्पादकांशी चर्चा, महिलांसह विविध घटकांशी संवाद आदी कार्यक्रमांचे नियोजन वेगवेगळ्या मतदारसंघात करण्यात आले आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी सायंकाळी अजित पवार हे पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत.

Advertisement

मागील अनेक दिवसांपासून अजित पवार यांनी गुलाबी रंगाची थीम ठरवलेली आहे. ते जॅकेट देखील गुलाबी घालत असून, या यात्रेची देखील थीम गुलाबी रंग आहे. अजित पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते देखील गुलाबी रंगात दिसत आहेत. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या गाड्यांवर देखील गुलाबी रंग दिसून येत आहे. नाशिकच्या रस्त्यांवर राष्ट्रवादीचे झेंडे लावलेले दिसत असून सर्व गुलाबी रंगाचे पोस्टर झळकत आहे. नाशिकमधील कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे जंगी स्वागत केले आहे.

राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवार हे गुलाबी रंगाच्या बसमधून आले. त्यांच्या ताफ्यामधून गुलाबी वादळ येत असल्याचे दिसून येत आहे. नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातून अजित पवार गटाने प्रचाराचा शुभारंभ केला आहे. या यात्रेमध्ये सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची देखील जोरदार जाहिरातबाजी केली आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page