तडीपार असताना विनापरवाना शस्त्रासह पुणे शहरात वावरणा-या रेकॉर्डवरील सराईत तडीपार गुन्हेगाराला वानवडी पोलीसांनी केले जेरबंद..!

वानवडी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील स्टाफ हा रात्रगस्त अधिकारी यांचेसोबत रात्रगस्ती दरम्यान पेट्रोलिंग करीत पो.स्टे.चे कार्यक्षेत्रांतील रामटेकडी भागात दाखल गुन्हयांमधील पाहिजे/फरारी आरोपींचा शोध व माहिती घेत असताना दि. २६/०४/२२०२५ रोजी रात्रौ ०१/०० वा.चे सुमारास रामटेकडी भागात आले असता, पोलीस अंमलदार अभिजीत चव्हाण व बालाजी वाघमारे यांना संयुक्तीकरित्या गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वानवडी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार इसम नामे माधव मधुकर घुमरे, वय ४२ वर्षे, रा. स. अंधशाळेसमोर, रामनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे हा रामटेकडी अंधशाळेसमोर, हडपसर, पुणे येथे एकटाच संशयितरित्या कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्येशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु जवळ बाळगुन वावरत आहे.

Advertisement

अशी बातमी मिळाल्याने सदरबाबत रात्रगस्त अधिकारी व स्टाफ यांनी वरिष्ठांना कळवुन, वरिष्ठांचे परवानगीने अंधशाळेसमोर, रामटेकडी, हडपसर, पुणे येथे जावुन पाहणी केली असता तेथे रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार नामे माधव घुमरे हा संशयितरित्या थांबलेला असताना दिसुन आल्याने पोउनि हनुमंत भोसले व स्टाफ यांनी त्यास अत्यंत शिताफीने सापळा रचुन ताब्यात घेऊन, त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक लोखंडी कोयता मिळून आला. तसेच तो तडीपार मुदतीत विनापरवाना पुणे शहरात आल्याचे समजले म्हणुन त्यास ताब्यात घेवुन वानवडी पोलीस ठाणे येथे आणुन त्याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ व ३७ (१) (३) सह १३५ आणि आर्म अॅक्ट कलम ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन नमुद गुन्हयात नमुद आरोपीस अटक करुन मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

नमुद आरोपी याचेवर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, दंगा, मारामारी, जबर दुखापत आणि एनडीपीएस सारखे गंभीर गुन्हे वानवडी पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस हवालदार महेश गाढवे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्री. धन्यकुमार गोडसे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो.स्टे. पुणे शहर श्री. सत्यजीत आदमाने, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. गोविंद जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक धनाजी टोणे, पोलीस उपनिरिक्षक हनुमंत भोसले व पोलीस अमंलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाने, अतुल गायकवाड, यतीन भोसले, विष्णु सुतार, अभिजीत चव्हाण, बालाजी वाघमारे व सोमनाथ कांबळे यांनी केली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page