पुण्यात पावसाचा हाहाकार! भिडे पुलासह अनेक पूल पाण्याखाली

पुणे : पुणे शहरात हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टचा परिणाम दिसून आला. पुण्यात बुधवार रात्रीपासून शहरात पाण्याचे तांडव सुरु आहे. पावसाच्या या हाहा:कारामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे महानगरपालिका हद्दीतील अनेक पुल पाण्याखाली गेले आहेत.
पुण्यातील हे पूल पाण्याखाली
बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.
पुणे महानगरपालिका हद्दीत एकता नगरी सिंहगड रोडवरील द्वारका सोसायटी, शरदा सरोवर सोसायटी, शाम सुंदर सोसायटी, निंबजनगर परिसरातील सोसायटी, सिंहगड रोड, घरकुल सोसायटी पिंपरी चिंचवड, वृंदावन आश्रम आकुर्डी विशालनगर, जगताप डेअरी विणस सोसायटी, कुंदननगर या गृह निर्माण हाउसिंग सोसायटी मध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शाळा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील घाट विभागात देखील पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे पुण्यातील धरणात पाण्याची आवक वाढली आहे. जिल्ह्यात अनेक नद्यांना ओढ्या नाल्यांना पुर आल्याने व धरणातील पाणी वाढणल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




