बेकायदा गोवंश जातीचे मांस व जनावरे बाळगणारे लोकांवर कारवाई..!

बेकायदा गोवंश जातीचे मांस व जनावरे बाळगणारे लोकांवर कारवाई

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड , बारामती विभाग,बारामती यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार , बारामती शहरातील देवळे इस्टेट येथील माढा कॉलनी येथे काही इसम गोवंश जातीचे मांस व जिवंत जनावरे बेकायदा जवळ ठेवले बाबत मिळालेल्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग, बारामती येथील पोलीस अंमलदार तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये 1200 किलो गोवंश जातीचे मांस तसेच दोन जर्सी गाई व दोन जर्सी वासरे तसेच तीन चार चाकी वाहने असा एकूण 6,42,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला असून एकूण सात इसम यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास बारामती शहर पोलीस स्टेशन करीत असून यामध्ये आणखीन काही इसम यांची नावे पुढे येण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे.

Advertisement

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सो. बारामती, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड सो. बारामती विभाग,बारामती यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन करीत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page