सहा महिन्यापासून फरार असणा-या आरोपीस केले जेरबंद..!

दिनांक १६/०५/२०२५ रोजी फिर्यादी यांचे राहते घरी फिर्यादी यांचे मुलास नमुद आरोपी व ०५ विधीसंघर्षीत बालक यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मारण्यासाठी धारदार हत्यार हवेत फिरवत फिर्यादी यांचे मुलास मारण्याची धमकी देत बिबवेवाडी पुणे येथील भागात दहशत पसरवली म्हणून आरोपीतांविरुध्द दिनांक १७/०५/२०२५ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.न ११२/२०२५ भा.न्या.सं.क. ३३३, १८९(२), १८९ (४), १९०, १९१(३) ३५१ (३), ३५२, म.पो.का.क. ३७ (१) (३), १३५, आर्म अॅक्ट. क. ४ (२५), क्रिमीनल लॉ अॅमेंटमेंट अॅक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यातील नमुद आरोपी हा सहा महिन्यापासुन फरार होता.

Advertisement

नमुद गुन्हातील फरार आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार आशिष गायकवाड, व रक्षित काळे यांना गुप्त बातमिदारांमार्फत बातमी मिळाली की, बिबवेवाडी येथे सदर दाखल गुन्ह्यातील आरोपी हा अप्पर डेपो, पाण्याची टाकी, बिबवेवाडी पुणे येथे थांबलेला आहे. सदरची बातमी मिळताच तात्काळ पोलीस तपास पथक नमुद ठिकाणी जावुन सदर आरोपी नामे संदेश दिलिप सौदागर, वय २२ वर्षे, रा. मार्केटयार्ड पुणे यास ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप- आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त गोडसे वानवडी विभाग पुणे शहर, श्री. धन्यकुमार, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती. अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सुरज बेंद्रे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस अंमलदार गायकवाड, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सुमित ताकपेरे, रक्षित काळे, विशाल जाधव, संतोष बनसुडे, राहूल खाडे व अभिषेक धुमाळ यांनी केली.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page