आदरणीय सर, जय हिंद…कर्णकरकश्य आवाजाचे सायलेन्सर लावलेल्या बुलेटवर कारवाई केलेबाबत…

आज रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बुलेट चालक हे सायलेन्सर बदलून त्यामधून फटाके फोडत असल्या बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावर कारवाई करण्यासाठी 4 अधिकारी व 15 अंमलदार यांची पथके तयार करून त्यांना हद्दीमधील वेगवेगळ्या भागात नेमण्यात येऊन मॉडिफाइड सायलेन्सर , विदाऊट नंबर प्लेट,अशा एकूण 22 बुलेट गाड्या ताब्यात घेण्यात आल्या .
सदर गाड्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून घेण्यात आले. तसेच वाहतूक अंमलदार यांचे मार्फत त्यांचेवर **25000/-* रुपये दंडात्मक कारवाई करून सदर वाहनाचे मूळ सायलेन्सर बसवून तसेच ज्या गाड्यांना नंबर प्लेट नव्हत्या त्यांच्यावर कारवाई करून त्यांना नंबर प्लेट बसवून सदरची वाहने वाहन मालक यांचे ताब्यात देण्यात आली आहेत.
सविनय सादर.
( राजेंद्र पन्हाळे )
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर
Advertisement




