पुण्यात घरफोड्यांचं सत्र सुरुचं, डेक्कन परिसरात फ्लॅट फोडून ऐवज लंपास

पुणे : पुण्यात घरफोड्यांचं सत्र सुरुचं आहे, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून घरफोडींच्या घटना उघडकीस येत असतात, अशातचं आता बीएमसीसी रोड परिसरातील एका फ्लॅटवर चोरट्यांनी भरदिवस डल्ला मारून ६९ हजार रुपयांची रोकड लंपास केली. याबाबत ५४ वर्षीय महिलेने डेक्कन पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि १४) सकाळी साडे अकरा ते दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारादर या काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. चोरट्याने फ्लॅटचे कुलूप उचकटून प्रवेश केला. त्यानंतर सदनिकेतील ६९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरी करून पळ काढला. तक्रारदार घरी आल्या तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे समजले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




