अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन ४३,८७,०००/- रु किं. चा चरस व गांजा जप्त..!

अंमली पदार्थ विरोधी पथकाकडुन ४३,८७,०००/- रु किं. चा चरस व गांजा जप्त

दि.१०/०१/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, चे सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व स्टाफ असे भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेले बाळेमीवरुन इसम नामे अरुण अशोक अरोरा वय-५० वर्षे, रा-प्रितम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज पुणे याच्या ताब्यात एकुण ४३,८७,०००/- रू.कि.चा ऐवज त्यामध्ये २ किलो १४० ग्रॅम चरस व १ किलो ७९० ग्रॅम गांजा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज जप्त करून त्याचे विरुध्द भारती विदयापिठ पोस्टे गु.र.नं.२७/२०२४, एन.डी.पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनिकेत पोटे, अ.प.वि.प.१. गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.

Advertisement

वरील नमुद कारवाई ही मा.पोलीस आयुक्त, श्री.अमितेश कुमार, मा सह पोलीस आयुक्त, श्री.रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे. २, श्री. राजेंद्र मुळीक याचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सहा पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, संदिप जाधव, दिशा खेवलकर, रविंद्र रोकडे यांनी केली आहे.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page