आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर 4 येथे अवैधरीत्या व बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून मिळतो..!

प्रेस नोट दि.11/02/2025
मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर
आज रोजी गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की आंबेडकर नगर येथील गल्ली नंबर 4 येथे अवैधरीत्या व बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करून मिळतो. अशी बातमी मिळताच आम्ही स्वतः व आमच्या पोलीस स्टेशन अधिकारी अंमलदार व दोन पंचासह आंबेडकर नगर येथे गेलो असता गल्ली नंबर 4 येथील दावल एंटरप्राइजेस या दुकानांमध्ये बेकायदेशीरपणे घरगुती वापराचे मोठ्या गॅस सिलेंडर मधून लहान गॅस सिलेंडर मध्ये निष्काळजी पणे,गॅस रिफिलिंग करून देण्याचे काम बेकायदेशीर पणे चालू होते. सदर ठिकाणची अधिक पाहणी केली असता त्या ठिकाणी गॅस रिफिलिंग साठी लागणारे सर्व सामान आम्हास मिळून आले. सदर कार्यवाहीचा पंचा समक्ष पंचनामा करण्यात आलेला असून BNS कलम 287,288 सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955 कलम 3 व 7 अन्वये गु. रजि.नंबर 20 / 25गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपीत बंदी नवाज उर्फ सलीम गुलाब शेरीकर वय 35 राहणार आंबेडकर गल्ली नंबर 4 दावल मिनी स्टोअर मार्केट यार्ड पुणे यास ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

(मनिषा पाटील)
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
मार्केटयार्ड पोलीस स्टेशन

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page