वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथील ग्राउंडवर दंगा काबु योजना रंगीत तालीम सराव करण्यात आला..!

आगामी राम नवमी,रमजान ईद, गुढीपाडवा सणांचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखणे कामी दिनांक 22/03/2025 रोजी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथील ग्राउंडवर दंगा काबु योजना रंगीत तालीम सराव करण्यात आला . तसेच आगामी राम नवमी, रमजान ईद, गुढीपाडवा सण उत्सवाचे अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे जातीय सलोखा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते सदर बैठकीस 50 ते 60 जनसमुदाय उपस्थित होता उपस्थित जनसमुदायास नवीन कायदेविषयक तसेच सोशल मीडियावरील स्टेटस, इन्स्टाग्राम वरील रिल्स याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच दि.24/03/2025 रोजी सायं 17/00 वा. ते 18.30 वा दरम्यान आगामी रामनवमी,रमजान ईद, गुढीपाडवा सणांचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखणे कामी मौजे वडगाव निंबाळकर, कोराळे बुद्रुक, तसेच करंजेपुल या गावांचे ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला आहे. तसेच दिनांक 22/3/2025 रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून विविध तक्रारदार यांचे तक्रारीचे निवारण करण्यात आले .

Advertisement
         विनम्र 

सपोनि सचिन काळे
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page