अट्टल घरफोड्या करणा-या सराईत आरोपीकडुन दोन घरफोडीचे गुन्हे उघड भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी..!

अट्टल घरफोड्या करणा-या सराईत आरोपीकडुन दोन घरफोडीचे गुन्हे उघड भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी

दिनांक ०५/१२/२०२४ रोजी फिर्यादी यांचे राहते घरातुन दोन अनोळखी चोरटयांनी फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचे कुलूप तोडुन आत प्रवेश करुन हॉलचे पोटमाळ्यावर ठेवलेली लोखंडी पेटीचे कुलप कॉयडा तोडुन त्यातील १,००,०००/- रू. चोरुन नेले म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर १०२५/२०२४ भारतीय न्याय संहीता कलम ३३१ (४),३०५.३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपींचा शोध घेणेबाबतच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.डी.एस.पाटील यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर हे शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी जितेंद्र ऊर्फे जितु शंकर चिधे, वय ३१ वर्षे, रा. काका पवार तालीमजवळ, जांभुळवाडी रोड, साईबाबा मंदीरा शेजारी, आंबेगाव बु, पुणे याने केल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी सदरचा आरोपीचा शोध घेत असताना तो जांभुळवाडी येथे मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक केली आहे.

Advertisement

पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी कडुन ६०,०००/-रु. किं.ची सोन्याची मोहनमाळ व ५०००/- रुपये रोख रक्कम जप्त केले असुन आरोपी कडुन वरील नमुद गुन्हा तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ८२९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३०५ प्रमाणे असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग. पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.डी.एस. पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता देवकाते, श्री. राहुलकुमार खिलारे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, सचिन सरपाले, वेतन गोरे, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, यांच्या पथकाने केली आहे.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page