जुगार अड्यावर छापा टाकुन ०५ जणांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन ४,३०,३६०/- रु.कि.चा मुददेमाल केला हस्तगत..!

खराडी पोलीस स्टेशन हद्दीत दि.०७/०५/२०२६ रोजी रात्रौ ००/२० वा.चे सुमा महालक्ष्मी लॉन्स शेजारील मोकळ्या जागेत, खराडी, पुणे येथे काही इसम पैसे लावुन १३ पानी जुगार खेळत असल्याची माहिती खराडी पोलीस स्टेशन मधील तपास पथक पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संजय चव्हाण, यांना दिली असता त्यांनी तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व तपासक पथक अंमलदार यांना तात्काळ कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्याप्रमाणे दि.०७/०५/२०२६ रोजी रात्रौ ००.४५ वा. चे सुमा सहा पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक, गणेश घुले व स्टाफ यांनी महालक्ष्मी लॉन्स शेजारील मोकळ्या जागेत, खराडी येथे रवाना होउन सापळा रचुन जुगार अड्यावर धाड टाकली असता सदर कारवाईमध्ये १३ पानी जुगार खेळणारे इसम नामे १) करीम खाजामिया मोमीन, वय २६ वर्षे रा. ग्लोबल रेडमिक्स, खांदवेनगर, लोहगांव २) प्रशांत श्रिकांत आव्हाळे, वय ४३ वर्षे रा. ग्रामपंचायत ऑफीस जवळ, आव्हाळवाडी ३) अब्दुल जब्बाल लष्कर, वय ३८ वर्षे, रा लेन नं.३, बोराटे वस्ती, चंदन नगर ४) दशरथ धानोजी वाघमारे, वय २७ वर्षे, रा. निरामय हॉस्पिटल, वाडेश्वर नगर, वडगांव शेरी, पुणे व जुगार अड्याचा चालक इसम ५) रुषीकेश राजाराम अंधे, वय ३४ वर्षे, रा. ए एम कॉलेज जवळ, कृष्णाई सोसायटी, मांजरी, पुणे यांना रंगेहाथ पकडून व त्यांचेकडुन ८०,१४०/- रु रोख रक्कम, १,००,०००/-, रु की. चे ५ मोबाईल फोन २,००,०००/- रु.कि.ची एक चार चाकी मारुती कंपनीची स्विफ्ट गाडी, ५०,०००/- रु.की.च्या दोन मोपेड दुचाकी गाड्या व जुगाराचे तत्सम साहित्य असे एकुण ४,३०,३६०/- रु.की.चा मुददेमाल हस्तगत करून नमुद इसमांविरुध्द खराडी पोलीस स्टेशन, गु.र.नं. १५०/२०२६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ५, १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोजकुमार पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ७, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर श्रीमती नुतन पवार, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खराडी पोलीस स्टेशन, श्री. संजय चव्हाण यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक श्री. गणेश घुले, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, मनोज खरपुडे, विलास केदारी, अशोक केदार, सुरज जाधव, महेश बोराडे यांनी केली.




