२७ ग्राम एम.डी. (मेफेड्रान) अंमली पदार्थ बाळगणा-या दोन इसमांवर कारवाई..!

दिनांक ०३/०२/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा यांनी पुणे शहरात विविध भागात खराडी पोलीस स्टेशन हदद्दीत गस्त करीत असताना पहाटे ०५/२८ चे सुमा. खराडी ईओन आयटी पार्क फेज २ मागील गेट जवळ खराडी पुणे येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी इसम नामे १. मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित, वय २८ वर्षे, रा. प्लॅट नं ०६ धोका बिल्डींग, लोहगांव रोड वाघोली पुणे मुळ गांव राधाकृष्ण मंदिराजवळ बासणी तहसिल शेरगड जि जोधपुर राजस्थान, २. हरीष सुजनाराम देवासी, वय २२ वर्षे, रा. लेन नं २, बायफ रोड, वाघोली पुणे मुळ गांव गुडामालाणी जि बाडमेर राजस्थान यांच्या ताब्यात एकुण १२,४१,०००/- रू कि चे २७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज संगनमातने, अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आले. म्हणुन सदर आरोपी विरुध्द खराडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

Advertisement

सदरची कारवाई, मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पकंज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे-३, श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. पंडीत रेजितवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुभांगी म्हाळसेकर व खराडी पोलीस स्टेशन कडील कॉप्स २४ मार्शल चे पोलीस अंमलदार पगारे, जाधव यांचे पथकाने केलेली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page