धक्कादायक ! पूना हॉस्पिटलच्या पूलावरून मुलगा पडला पाण्यात, पुण्यातील घटना

पुणे : पुण्यातील खडकवासला धरणामधून पाण्याच विसर्ग सोडल्याने परत भिडे पूल पाण्याखाली गेलाय. पाटबंधारे खात्याकडून याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे नदीपात्रातील गाड्या काढून घेण्याच्या सूचना पोलिसांनी नागरिकांना दिल्या होत्या. अशातच पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील पुना हॉस्पिटल येथील पुलावरून एक मुलगा पाण्यात पडला आहे. अग्निशामक दलाकडून शोधकार्य सुरू झालं असून दोन पथके रवाना झाली आहेत.

Advertisement

अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, हा मुलगा शाळेच्या गणवेशावर होता. तो दप्तर पाठीवर घेऊन होता. पुना हॉस्पिटललगत असलेल्या पुलावर हा मुलगा बसलेला होता. त्याच्या अंगावर शाळेचा निळा रंगाचा गणवेश होता. तो अचानक दप्तरासह पुलावरून खाली पाण्यात पडला. प्रत्यक्ष दर्शीनी लागलीच ही माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानुसार अग्निशमन दलाने इथे धाव घेत मुलाचा शोध सुरू केला आहे. अग्निशमन दलाने लागलीच दोन पथके तयार करून मुलाचा शोध सुरू केला आहे.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page