सतीश वाघ हत्या प्रकरण : एका आरोपीला पकडण्यात यश, अन्य चार आरोपींचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे…

हडपसर येथील भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून काल सकाळी पहाटेच्या सुमारास पाच जणांनी चारचाकी वाहनातून अपहरण केल्याची घटना घडली होती.

पुणे : हडपसर येथील भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून काल सकाळी पहाटेच्या सुमारास पाच जणांनी चारचाकी वाहनातून अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सतीश वाघ यांचा काल मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मामाची हत्या होऊन २४ तास उलटून देखील आरोपींचा शोध लागत नव्हता. यामुळे सत्ताधारी पक्षावर टीका होऊ लागली होती. त्याच दरम्यान या प्रकरणी पुणे पोलिसांनी १६ पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केल्या होत्या. त्याच दरम्यान एका आरोपीला पुणे पोलिसांनी वाघोली येथून ताब्यात घेतले असून त्या आरोपीकडे पोलिस चौकशी करीत आहे.

Advertisement

आरोपीला शोधण्यासाठी १६ पथके रवाना : अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील

सतीश वाघ हे काल पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत असताना चारचाकी वाहनातून आलेल्या तीन चार जणांनी त्यांना गाडीमध्ये जबरदस्तीने बसवून घेऊन गेले. ही घटना एका व्यक्तीने पहिली आणि त्यानंतर या घटनेची तक्रार वाघ यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे केली. त्यानुसार आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर विविध भागांत पथके रवाना करण्यात आली. मात्र काल सायंकाळच्या सुमारास सतीश वाघ यांचा मृतदेह यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. तसेच आरोपींच्या शोधासाठी १६ पथके रवाना केल्या आहेत. या प्रकरणी आम्ही तांत्रिक दृष्ट्या देखील शोध घेत आहे. त्याचबरोबर सतीश वाघ यांचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी काही तासात तीक्ष्ण हत्याराने मारल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. या एकूणच घटनेची पुणे पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असून ही हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही. या प्रकरणातील आरोपी सायंकाळपर्यंत ताब्यात येण्याची शक्यता आहे.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page