अल्पवयीन मुलाकडून ज्येष्ठ नागरिकाच्या खुनाचा प्रयत्न; डोक्यात दगड मारला अन्…

पुणे : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, पुण्यातील वेगवेगळ्या भागतून अनेक घटना समोर येत आहेत अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुळणा करताना हटकल्याने अल्पवयीनाने ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात दगड मारल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली आहे. ज्येष्ठाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

बाशीर हैदर चौधरी (वय ६८, रा. गणेश कॉलनी, महादेवनगर, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा समीर बाशीर चौधरी (वय ४०) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बाशीर २१ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास गॅरेजसमोर थांबले होते. त्यावेळी मुलगा गुळण्या करत होता. बाशीर यांनी त्याला हटकले. मुलाने बाशीर यांच्या डोक्यात दगड मारला. पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर अधिक तपास करीत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page