पुणे-सातारा रस्त्यावर टोळक्याची दहशत, तरुणावर कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?

पुणे : पुणे-सातारा रस्त्यावर पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दहशत माजवून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला. या हल्यात उदय हरिदास वैराळ (वय २२, रा. ओटा परिसर, बिबवेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धार्थ अशोक शिगवण (रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी), सोनू शिंदे (रा. महर्षीनगर) यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला. याबाबत उदय वैराळ याने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
उदय वैराळ याचा आरोपींशी वाद झाला होता. रविवारी रात्री अकराच्या सुमारास वैराळ पुणे-सातारा रस्त्यावरील शिल्पा हॉटेलजवळ थांबला होता. त्यावेळी सिद्धार्थ शिगवण, सोनू शिंदे साथीदारांसह तेथे आले. आरोपींनी दहशत माजवून त्याला शिवीगाळ केली. शिगवण, शिंदे यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी वैरळाला मारहाण केली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




