छोट्या मोठ्या पतसंस्थांवर कारवाई करून चिपळूणातील एका पतसंस्थेचा आर्थिक व्यवहार वाढवण्याचा सहकार विभागाचा प्रयत्न..!

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील श्यामराव नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेत चार कोटी बावीस लाख एकयाऐनशी हजार एकवीस रुपयाचा अपहार झाल्याचा रत्नागिरीच्या सहकार विभागाने प्रकार उघड केला. या घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी पदाधिकारी, संचालक व कर्मचारी अशा सोळा जणांविरुद्ध खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. या बद्दल सहकार विभागाचे मात्र एवढे कर्तव्यदक्ष असणारे सहकारचे अधिकारी श्री. विनोद वामनराव आंड्रस्कर ऑडिटर यांचे अभिनंदन.

मात्र चिपळूण मधील एका मोठ्या पतसंस्थेचा भ्रष्टाचाराची फाईल व तक्रारी देऊनही ढीगभर पुरावे असताना या पतसंस्थेकडे आयुक्त व सहकार मंत्री कारवाई का करत नाहीत? याकडे डोळे झाक का केली जात आहे?

Advertisement

चिपळूण मधील या एका बड्या व नामांकित पतसंस्थेत साधारण तीनशे कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार व पैशात अनियमितता असून देखील फक्त या पतसंस्थेकडून मिळणाऱ्या आर्थिक फायद्यामुळेच सहकार विभागाचे मंत्र्यापासून ते उपनिबंधकापर्यंत सर्व अधिकारी या पतसंस्थेवर कारवाई करण्यास धजावत नाहीत. याच पतसंस्थेच्या सांगण्यानुसार सहकार विभागाचे अधिकारी छोट्या मोठ्या पतसंस्थांवर कारवाई करून त्या पतसंस्था बंद करून चिपळूणातील मोठ्या पतसंस्थेकडे ठेवी फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना व जिल्ह्याच्या निबंधकाना प्रत्येक तक्रारी मागे पतसंस्था अमाप पैसा देत असल्याने यावर कोणतीही कारवाई होत नाही. कारवाई केल्याचा आभास करून निबंधक त्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची नेमणूक करून चौकशीचा अहवाल या पतसंस्थेच्या बाजूने कसा होईल व केलेल्या आरोपातून क्लीन चीट कशी मिळेल याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र भविष्यात या पतसंस्थेचा होणारा आर्थीक भ्रष्टाचार एवढा वाढत चालला आहे की एक दिवस ठेवीदारांना ठेवी बुडल्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे व यास सहकार विभागाच्या उपनिबंधकांपासून ते सहकार मंत्र्यांपर्यंत सर्व जबाबदार राहतील ही भविष्य सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page