मुरलीधर मोहोळ, पंकजा मुंडेंवर पुण्याची जबाबदारी, विधानसभा निवडणुकीसाठी आढावा घेण्याचे काम सुरु

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुणे शहरात येणार्‍या आठ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानुसार मोहोळ यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेऊन आढावा घेण्यास सुरुवात केली आहे, तर पुढील आठवड्यापासून मुंडे या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

Advertisement

भाजपने प्रत्येक मतदारसंघात सूक्ष्म पद्धतीने नियोजन सुरू केले आहे. त्यासाठी प्रदेश कार्यालयाने प्रवासी बैठका हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यात प्रत्येक नेत्याकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघांतर्गत येणार्‍या कसबा पेठ, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट या तीन मतदारसंघांची जबाबदारी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्याकडे देण्यात आली आहे. शिवाजीनगर, कोथरूड, वडगाव शेरी, शिवाजीनगर आणि खडकवासला या पाच मतदारसंघांची जबाबदारी आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page