कर्तव्यदक्षतेची मिसाल!..खडक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी…..

.
खडक पोलीस ठाण्यात एक महिला घाबरलेल्या परिस्थितीत रडत रडत( प्रिया उत्तमराव भोईटे, राहणार गुडविल पॅलेस. मुक्ताई चौक रावेत) या खडक पोलीस ठाण्यात त्यांच्या लहान मुलासह तक्रार देण्यास आल्या होत्या . त्यांनी आपला मोबाईल (HUAWEI P20) रिक्षात विसरल्याची तक्रार दिली, तसेच त्या मोबाईल मध्ये अत्यंत महत्त्वाचा डेटा असल्याचे सांगितले तसेच त्या पुढच्या दोन दिवसांमध्ये जर्मनीमध्ये कामानिमित्त जाणार असल्याचे सांगितले. त्या संदर्भातील संपूर्ण डेटा हा मोबाईल मध्ये आहे व तो मोबाईल माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ,अशी विनंती केली त्यांची ती अवस्था पाहून तत्काल पथकातील अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्यातून रिक्षा क्र. MH 14 V 6998 असल्याचे समजताच तत्काल त्यांनी रिक्षा चालकांना फोन लावून रिक्षाचे सध्याचे लोकेशन घेऊन कासेवाडी येथून रिक्षा मधून मोबाईल सायलेंट मोडवर ताब्यात घेण्यात आला वरिष्ठांमार्फत नमूद महिलेच्या ताब्यात देण्यात आला सदर महिलेस परदेशी जायचे असल्याने व त्यांचा अत्यंत महत्त्वाचा डेटा मोबाईल मध्ये असल्याने त्या अत्यंत हतबल झाल्या होत्या .
अशावेळी खडक पोलीस स्टेशनच्या पथका दाखवलेल्या प्रतिसादाबाबत व तत्काल मदत करून मोबाईल परत मिळवून दिल्या बाबत सदर महिलेने खडक पोलिसांचे शतशः आभार मानले.

Advertisement

मा.संगीता यादव
वरिष्ठ पोलीस निरीक्षक

खडक पोलीस स्टेशन पुणे.
प्रतिनिधी
जनक टाइम्स times पुणे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page