बेकायदा पिस्तूल बाळगणारा सराईत जेरबंद, खराडी पोलिसांच्या तपास पथकाची कारवाई

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांचे चेकींग सुरू असतानाच खराडी पोलिसांनी पिस्तूल बाळणार्या सराईताला अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन काडतुसे जप्त केली आहेत. आदित्य अतिश मोहिते (वय २१, रा. रामवाडी, येरवडा) असे सराईत गुन्हेगाराचे नाव आहे़. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय चव्हाण, सहायक निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांच्या पथकाने केली.
खराडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक राहुल कोळपे व त्यांचे पथक हद्दीत विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दीत पेट्रोलिंग व गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार सुरज जाधव व श्रीकांत कोद्रे यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की, आदित्य मोहिते हा सराईत गुन्हेगार खराडीतील ईवॉन आय टी पार्क येथे पिस्टल घेऊन येणार आहे. यामाहितीची खातरजमा केली. त्यानंतर पथकाने या भागात सापळा रचला. मात्र, पोलिसांची चाहुल लागताच आदित्य तेथून पळालाला. पण पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन काडतुसे मिळाली. मोहिते याने हे पिस्टल व काडतुसे कोठून व कशासाठी आणले. तो कोणाचा घातपात करणार होता का याचा तपास उपनिरीक्षक वैशाली तांगडे करीत आहेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




