जिममध्ये फॅन बंद करण्यावरून झाल वाद; नंतर केला महिलेचा विनयभंग

पुण : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीममध्ये व्यायाम करताना फॅन बंद करण्यावरून झालेल्या वादानंतर एकाने अश्लील हातवारे करीत महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार कल्याणीनगर येथील अमेझॉनअस या जीममध्ये घडला.

याप्रकरणी कल्याणीनगर येथील फॉर्टलिझा सोसायटीत राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने येरवडा पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार आदम असवानी (वय ४६, रा. फोर्टलिझा सोसायटी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २१ ऑगस्टला रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.

नेमकं काय घडलं?

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला व आरोपी एकाच सोसायटीत राहतात. घटनेच्या दिवशी महिला जीममध्ये व्यायाम करायला गेल्या. तेव्हा त्यांनी फॅन सुरू केला. त्यानंतर आरोपीने फॅन बंद केला, तेव्हा तक्रारदारांनी पुन्हा फॅन सुरू केला. आरोपीला त्याचा राग आला. त्याने फॅन बंद करून त्याचा स्विच तोडून महिलेच्या दिशेने फेकला. तसेच, फॅनमुळे माझ्या व्यायामात अडथळा होत असून, मी गेल्या आठ वर्षांपासून इथे व्यायाम करतो, असे महिलेकडे पाहून सुनावले. त्यानंतर तक्रारदार महिला जीममधून निघून गेल्या. मात्र, मोबाइल विसरल्याने तो घेण्यासाठी महिला परत आली. तेव्हा जीममधील गार्ड त्यांना समजावत असताना, आरोपीने महिलेकडे पाहून हसून अश्लील हातवारे केले. येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page