बिबबेवाडी पोलिसांनी तब्बल 50 गाळ मोबाईल केले नागरिकांना सुपूर्त……
बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये प्रवासादरम्यान व विविध ठिकाणाहून मोबाईल हँडसेट गहाळ झाले , याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे व ऑनलाईन तक्रार प्राप्त झाल्या होत्या सदर गहाळ झालेल्या मोबाईल हँडसेटचे बिबवेवाडी पोलीस ठाणे कडील सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण काळोखे व पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय आदलिंग असे व तपास पथकातील स्टाफसह तपास करीत असताना पोलीस अंमलदार सतीश मोरे यांनी सीईआर प्रणालीचे माध्यमातून तांत्रिक विश्लेषण करून विविध कंपन्यांचे एकूण 5,00,000 किमतीचे एकूण 50 हँडसेटचा शोध घेऊन हस्तगत केले.
हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हँडसेट आज दिनांक 05 /07 2023 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता डमढेरे यांच्या शुभहस्ते तक्रारदार नागरिकांना सुपूर्त करण्यात आले मोबाईल हँडसेट परत मिळाल्याने तक्रारदारांनी बिबवेवाडी पोलीस तपास पथकाचे आभार मानले व केलेल्या कामाचे कौतुक केले .
सदर कामगिरी मा. पोलीस उपयुक्त परिमंडळ झिरो पाच श्री विक्रांत देशमुख माननीय सह पोलीस आयुक्त वानरडी विभाग श्री शाहूराजे साळवे बिवेवाडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता डमढेरे तसेच पोलीस निरीक्षक गुन्हे सौ. अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस परीक्षा निरीक्षक ,श्री.प्रवीण काळोखे यांचे सह पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग ,पोलीस अंमलदार संतोष जाधव, सतीश मोरे ,तानाजी सागर ,ज्योतिष काळे ,प्रणय पाटील अतुल महांगडे ,अमोल जाधव ,शिवाजी येवले व अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.
वार्ताहर .
अकबर मेमन
जनहक्क टाइम्स ,पुणे.




