मविआ सरकार आले तर सोयाबीनची खरेदी ७ हजार रुपये प्रति क्विंटलने करू, काँग्रेसची मोठी घोषणा

पुणे : महाविकास आघाडी सत्तेत आली तर सोयाबीन खरेदी 7000 रुपये प्रति क्विंटल दराने करेल, अशी मोठी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे.सोयाबीनचे पडलेले दरामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा रोष सत्ताधाऱ्यांवर आहे. हेच लक्षात घेऊन मविआ सरकार सत्तेत आले तर सोयाबीनची खरेदी ७ हजार रुपये प्रति क्विंटलने करू, अशी घोषणा मल्लिकार्जून खरगे यांनी केली.

मल्लिकार्जुन खरगे पुढं म्हणाले, इथं शेतकऱ्यांबाबत चर्चा होत नाही, विदर्भ, मराठवाडा आणि नाशिकला गेलो होतो. तिथं सर्वांची मागणी आहे सोयाबीनचे दर वाढवा, कापूस खरेदी करण्याची व्यवस्था करा, कांदा खरेदी करण्यासाठी व्यवस्था करा. या सर्वांची एमएसपी केंद्र सरकार ठरवते. याबाबत शेतकऱ्यांना मदत करण्यास तुम्ही काय केलं, असा सवाल मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

Advertisement

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडीच्या लोकांनी पंचसूत्रीचा कार्यक्रम दिला आहे. कांद्यासाठी समिती करुन कोणता भाव द्यायचा हे ठरवणार आहोत. सोयाबीनचा हमीभाव दिला जात आहे. मात्र, सोयाबीनचा हमीभाव देऊ त्याशिवाय शेतकऱ्यांना बोनस देऊ, आम्ही 7 हजार रुपये क्विंटल निश्चित करुन त्याचा फरक शेतकऱ्यांना देण्याचा निर्धार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी आमच्या सरकारनं जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण केली आहेत असं म्हटलं.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page