‘आम्ही हे करु’! राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा जाहीरनामा आज सादर केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहिरनाम्यातून मनसेने आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित केला. मुलभूत गरजांसह महिला सुरक्षेचा, तरुणांना नोकरी अशा सर्वसामान्यांच्या प्रश्नावर मनसेने भर दिला आहे.
प्रसिद्ध जाहीरनाम्यात काय?
मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात पहिल्या भागात मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टींचा समावेश आहे. महिला, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, रोजगार आहे. तर दुसऱ्या भागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा,पर्यावरण, इंटरनेट इ. तर प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, ते देखील पाहा असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
इतर पक्षांनी जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्या पेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असंही ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




