देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार ?, अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा आपल्याला विजयी करायचे आहे, असे विधान अमित शाह यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा अर्थ फडणवीस मुख्यमंत्री होणार. असा घेतला गेला.

अमित शाह नेमके काय म्हणाले होते?

“मी दीड महिन्यांपूर्वी विदर्भ, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र आदी महाराष्ट्रातील सर्व भागांचा दौरा केला. तेव्हा महायुतीचे सरकार आणायचे आणि फडणवीस यांना विजयी करायचे, हीच तेथील लोकांच्या मनात इच्छा आहे किंवा त्यांनी ठरविले आहे” असे विधान अमित शाह यांनी केले होते.

Advertisement

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल (दि. ९ नोव्हेंबर) शिराळा येथे जाहीर सभा झाली. या सभेत अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना विजयी करायचे आहे, असे विधान अमित शाह यांनी केले होते. या विधानाचे आता राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत. महायुतीने एकनाथ शिंदेंनाच पुन्ह मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला आहे, असे एकाबाजूला सांगितले जाते. तर महायुतीचे नेते निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होईल, असे सांगत आहेत. त्यातच अमित शाह यांनी फडणवीस यांचे कौतुक केल्यामुळे महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार काय म्हणाले?

पिंपरीमधील मेळाव्यात अमित शाह यांच्या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले, अमित शाह यांना सांगण्याचा अधिकार आहे. शेवटी निवडणूक झाल्यानंतर सर्व आमदार एकत्र येतील. समन्वयाने चर्चा करतील. यामध्ये कुणाला वाईट वाटण्याचे किंवा गैरसमज करून घेण्याचे काहीच कारण नाही.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page