अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता व गुन्हेगारी याबाबत समुपदेशन कार्यशाळा आयोजित…….
दिनांक 08/07/2023 रोजी दुपारी 12/30 वा ते 13/45 वा चे दरम्यान कै. आनंदराव बागवे सांस्कृतिक भवन समाज मंदिर काशेवाडी येथे खडक पोलीस स्टेशन यांच्यावतीने माननीय श्री संदीपसिंह गिल पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली काशेवाडी येथील अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनता व गुन्हेगारी याबाबत समुपदेशन कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेसाठी 1)शितल अस्तित्व – डॉ. गायत्री कोटबागी 2) मनोदय दे एडिक्शन सेंटर- डॉ. विष्णू श्रीमंगले, मैत्री पांडे 3) तेरे देव होम्स – मंदार शिंदे यांचे उपस्थितीत काशेवाडी भवानी पेठ परिसरातील अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात आहेत अशा मुलांचे परिवर्तन करण्याकरिता मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेसाठी आम्ही स्वतः व श्री अशोक धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त फरसखाना विभाग, श्री.विनय पाटणकर पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन तसेच माजी नगरसेवक अविनाश बागवे, संदीप लडकत, भारत कांबळे, अर्चना पाटील यांचे सह खडक पोलीस स्टेशन कडील शांतता समिती, मोहल्ला समिती, अल्पसंख्याक समिती, महिला दक्षता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक व अल्पवयीन मुलांचे पालक हजर होते.
वार्ताहर
जन हक्क times पुणे.
आरती बाबर.




