कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी!😮

रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील डाॅक्टरांना किती रक्कम मोजली ?

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीनाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर शरण आलेला आरोपी अरुणकुमार सिंग याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शुक्रवारी न्यायालयाने दिले. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील डाॅक्टरांना सिंग याने किती रक्कम दिली, तसेच त्याच्या बँक खात्याची माहिती घेण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी सिंग याला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश

Advertisement

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मोटारचालक मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मोटारीतील मागील आसनावर असलेल्या दोन मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आरोपी अरुणकुमार देवनाथ सिंग (वय ४७, रा. विमाननगर) याने आशिष मित्तल आणि ससूनमधील डॉ. श्रीहरी हाळनोर आणि डाॅ. अजय तावरे यांना पैसे दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंग पसार झाला. त्याचा मुंबई उच्च न्यायालय, तसेच सर्वोच्च न्यायालायने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर तो शरण आला. पोलिसांनी त्याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले.आरोपी सिंगने ससूनमधील डाॅक्टरांना रक्त नमुन्यात बदल करण्यासाठी किती रक्कम दिली, तसेच त्याच्या बँक खात्याची माहिती घ्यायची आहे. तपासासाठी पोलीस कोठडी देण्याची विनंती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी यु्क्तिवादात केली.

बचाव पक्षातर्फे ॲड. अबिद मुलाणी आणि ॲड. सारथी पानसरे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी सिंग याला सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

संपादक -आरतीताई बाबर 8830914142

उपसंपादक -अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page