बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी मोठी अपडेट; आणखी एका आरोपीला पुण्यातून केली अटक

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. ही या प्रकरणातील १६ वी अटक आहे. या प्रकरणी आरोपी कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोलच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने गौरव विलास आपुणे (वय २३) याला अटक केली आहे. तो कर्वे नगर, पुणे येथील रहिवासी आहे. हल्ल्याच्या कटात त्याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. फरार आरोपींनी त्याला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही दिले होते.

यापूर्वी मुंबई पोलसांनी या प्रकरणात ३२ वर्षीय सुजीत सिंह याला अटक केली होती. त्याने परदेशातील गुंडाशी संपर्क साधला होता. सिंह याने विविध समाज माध्यमांतून अनेक खात्यांद्वारे त्याच्याशी संवाद साधला. तो परदेशातील गुंड अनमोल बिष्णोई असल्याचा संशय आहे.

Advertisement

१२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडल्या

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मुंबईतील नेते बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाबा सिद्दिकी बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांत त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या. रात्रीच्या अंधारात पसार झालेल्या आरोपींपैकी दोघांच्या पोलिसांनी शिताफीनं मुसक्या आवळल्या. पण तिसऱ्या आरोपीनं अंधाराचा आणि गोंधळाचा फायदा घेत तिथून पोबारा केला. मात्र, एका फोटोमुळे पोलिसांना आरोपींची ओळख आणि या सगळ्या कारस्थानाचा छडा लागला.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page