बाणेर टेकडीवर तरुणींना लुटणाऱ्या चोरट्याला अटक, अल्पवयीन साथीदारही पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहे. चोरीसोबतर चोरटे नागरिकांना लुटत असल्याच्याही घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता पुण्यातील बाणेर टेकडीवर फिरायला आलेल्या तीन तरुणींना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाइल, तसेच मुद्देमाल लुटून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

द्रापेत उर्फ विशाल प्रभाकर समुखराव (वय १९, रा. कुंभार चाळ, बोराडेवाडी, चिखली, मूळ रा. म्हाळुंगी, ता. चाकूर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी विशालबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

बाणेर टेकडीवर (दि. १३ ऑक्टोबर) सायंकाळी अबिनीयू खांगबबो चवांग (वय ३६) ही तरुणी तिच्या चिंगमलिऊ पामेई, अपर पामेई या मैत्रिणींसोबत फिरायला गेली होती. त्यावेळी तिघांनी त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील महागडे मोबाइल, इअर बड्स, पिशवी असा मुद्देमाल लुटला होता. तिघीही मूळच्या नागालँडमधील आहेत. अबिनीयू व चिगमलिऊ एका बीपीओत कामाला आहेत. या घटनेमुळे त्या प्रचंड घाबरल्या होत्या.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. तपास सुरू केल्यानंतर तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी विशाल व साथीदारांनी लुटमारीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. पुढील तपास बाणेर पोलीस करत आहेत.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page