सहाय्यक निबंधक मेंगे सोनल यांचं निलबंण करा, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आक्रमक, नेमकं प्रकरण काय?

पुणे – कलावती आनंद सावंत यांची दिनांक 21/7/2018 रोजीचे मृत्यू दाखला असून त्यांच्या ठिकाणी त्यांची डुप्लिकेट सह्या, डम्मी फोटो वापरून, दिनांक 18/10/2024 रोजी हवेली क्रमांक 19 या ठिकाणी दस्त नोंद करण्यात आली आहे. दस्त क्रमांक 22696 असे असून ह्या दस्तावर मयत कलावती अनंत सावंत यांचा फोटो लावण्यात आला असून. त्यांच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा पण घेण्यात आला असून आणि त्यांच्या सही पण करण्यात आली आहे, तरी कलावती अनंत सावंत यांची मयत 21/7/2018 रोजी त्यांच्या मृत्यू झाली असताना, त्यांच्या मृत्यू दाखला सुद्धा असताना, तरी त्या मयत व्यक्तीच्या 2024 मध्ये त्यांच्या खोट्या सही त्यांच्या खोट्या फोटो त्यांच्या खोट्या अंगठ्याचा ठसा घेऊन दस्त करण्यात आली, तरी दस्त नोंदणी करणारे प्रभारी अधिकारी मेंगे सोनल यांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, डमी व्यक्ती कोण आहे त्यांची संपूर्ण चौकशी यावी. अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्रे पाटील व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अकबर शिकलकर यांनी केली आहे.
क्षेत्रे पाटील व शिकलकर नेमकं काय म्हणाले?
दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 19 चे प्रभारी अधिकारी श्रीमती सोनल मेंगे यांनी कोणाच्या सांगण्यावरून खोट्या सह्या वापरून, खोट्या फोटो लावून मयत व्यक्तीच्या कुलमुक्तरपत्रावरून दस्त नोंद करण्यात आले आहे याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. अशीच एका प्रकरणांमध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रभारी निबंधक संतोष विर यांची खातेहीन चौकशी करून पाचशे रुपये स्टॅम्पवर दस्त नोंदणी करण्यात आलेले असताना, कॅन्सल करून त्याच्यावर चौकशी बसवून, दोन करोड रुपये वसुली करून शासन दरबारी जमा करण्यात आली. व संतोष वीरकर यांना निलंबित करण्याची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या तर्फे करण्यात आली आहे. दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 19 या ठिकाणी खूप मोठा प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाली असून ते सर्व भ्रष्टाचार हाणून पाडण्याचं काम अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कार्यकर्ते करीत आहेत.
दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत वेळोवेळी सांगून सुद्धा दुय्यम निबंधक वर्ग अशा प्रकरणांमध्ये कसे काय धाडस करू शकतात. प्रभारी सोनल मेंगे यांनीही सुद्धा अशा प्रकारच्या शासनाच्या महसूल बुडवण्याचे काम केला आहे, तरी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या तरी त्यांच्यावर त्वरित व तातडीने कारवाई करण्याची मागणी करीत आहे. अशाच प्रकारे दुय्यम निबंध कार्यालयामध्ये मोठा भ्रष्टाचार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जो प्रकरण घडलेला आहे ते सर्व जे , डी आर ,यांचे समोर उघड करून दाखविला त्यानंतर त्या दस्ताच्या आधारे शासनाचे महसूल बुडवणारे बिल्डर लॉबी कडून किमान दोन करोड रुपये वसुली करण्यात आली. ही गोष्ट आपण विसरता कामा नाही.
तसेच आज या ठिकाणी प्रभारी अधिकारी मेंगे सोनल यांनी वेळोवेळी खोटे दस्त केला आहे. असे समजते. तरी शासनाकडून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारच्या. कारवाई करण्यात टाळाटाळ करीत आहे. व कारवाई करण्यात आली नाही. आणि अशा प्रकारे शासनाच्या महसूल बुडवणारे दुय्यम निबंधक यांनी कोणाच्या आशीर्वादाने हा सगळं भ्रष्टाचार करीत आहेत. आणि त्यांच्यावर चौकशी का होत नाही ,? आता तरी त्यांच्यावर तुरंत व त्वरित कारवाई करण्यात यावी.
प्रभारी अधिकारीश्रीमती मेंगे सोनल यांच्यावर शासनाचे फसवणूक केल्याप्रकरणी, आयपीसी 120b,467,468,420,462,506,471,504,34, कलमाप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा व मेंगे सोनल यांना त्वरित व तातडीने निलंबित करून त्यांच्या खातेहीन चौकशी करण्यात यावी. व त्यांची सर्व मालमत्ता शासन दरबारी जप्त करण्यात यावी. व तसेच मान्यता देणारा अभिजीत त्रिबंक शिवणगे, व ज्ञानेश्वर व्यंकटेश शेपूर यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावी. जेणेकरून पुढे अशी कृत्य घडणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी, असं शिकलकर व क्षेत्रे पाटील यांची मागणी आहे.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




