मनोज जरांगेंनी माघार घेतल्यानंतर लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; नेमकं काय म्हणाले?

पुणे – मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. जरांगे-पाटील यांनी उमेदवारांच्या मुलाखत घेतल्या होत्या. रविवारी रात्रीपर्यंत ( 3 नोव्हेंबर ) मित्रपक्षांची यादी न आल्यानं निवडणुकीतून माघार घेतोय, असं जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केलं. जरांगे-पाटील विधानसभेच्या मैदानातून बाहेर पडताच ओबीसी नेते, लक्ष्मण हाके यांनी टीकास्र डागलं आहे. मनोज जरांगे निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयाला गनिमी कावा म्हणत आहेत. पण रणांगणात लढायला वाघाचं काळीज लागतं. मनोज जरांगे 130 उमेदवारांना पाडायची भाषा करत होते, त्याचं काय झालं, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
मी मी नेहमी सांगत आलो होतो, मनोज जरांगे निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे जाणार नाहीत. ते बारामतीच्या स्क्रिप्टनुसार वागत आहेत. जत्रा भरवणं सोपं असतं, पण लढणे अवघड असते. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीच्या सांगण्यावरुन प्रचार केला. मात्र, आता ओबीसी समाज एकटवल्याने मनोज जरांगे यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. ही माघार त्यांनी बारामतीकरांच्या सांगण्यावरुन घेतली आहे. रणांगणात लढायला वाघाचं काळीज लागतं, गनिमी काव्याचा काळ गेला, असा टोलाही लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना लगावला.
मनोज जरांगे पाटील हा दिवसाला भूमिका बदलणारा माणूस आहे. ते मुंबईच्या वेशीवरुन माघारी परतले होते. त्यांचा राजकारण, निवडणूक याबद्दल अभ्यास नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी पाठींबा दिला आहे ते आता काम करणार नाही. ज्यांनी जरांगे यांना पाठींबा दिला होता, त्यांचा कार्यक्रम आता ओबीसी करणार, त्यांना निवडणुकीत पाडणार, ज्यांनी पत्र दिले त्यांना भेटले त्याचा कार्यक्रम करणार, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




