मनोज जरांगेंच्या निर्णयावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले…

मुंबई – मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपण एकाही जागेवर उमेदवार उभा करणार नाहीत. सोबत घेतलेल्या पक्ष, घटकांनी आतापर्यंत आपल्या उमेदवारांची यादी न दिल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केले. पण मराठा समाजाने ज्याला पाडायचं आहे, त्याला पाडावं, असंही त्यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. आता, शरद पवार यांनी मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मत मांडलं आहे.

Advertisement

एका जातीवरून कोणीही निवडून येऊ शकत नाही. माझं एवढं राजकीय आकलन आहे. एवढ्या ताकदवान पक्षांनाही एकत्र यावं लागलं. राजकीय प्रक्रिया हाताळणं ही साधी गोष्ट नाही. मी तर या राजकीय प्रकरणात लेकरू आहे. आंदोलनात हजार पाचशे लोक असले तरी चालून जातं. मात्र राजकारणात लोकांची गोळाबेरीज करावी लागते, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. महाविकास आघाडीचा दबाव होता म्हणून मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली. या टीकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, “या महाविकास आघाडीचा कोणाशीही काही संबंध नाही. हा निर्णय मनोज जरांगेंचा आहे. पूर्वीचा निर्णयही (निवडणूक लढवण्याचा) त्यांचा होता. मला आनंद आहे की त्यांनी हा निर्णय घेतला. त्याचं एकच कारण आहे. ते सतत सांगत आहेत भाजपाला आमचा विरोध आहे. ते भाजपाविरोधात खेळले असते तर त्याचा फायदा भाजपालाच झाला असता. त्यादृष्टीने त्यांचा निर्णय योग्य आहे.”

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page