खडक पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी…
आज दि.27/04/2023 रोजी सकाळी 8/00 वा. सुमारास महिला नामे पल्लवी कुणाल लुंकड वय 39 धंदा= सीए रा. मानपाडा या पुणे स्टेशन वरून रिक्षा घेऊन पार्श्वनाथ जैन मंदिर पुणे येथे दर्शनासाठी आले असता त्यांची रिक्षामध्ये मौल्यवान वस्तू व महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग विसरली होती. सदर बॅगमध्ये 4 तोळ्याचे गंठण व एक लाख वीस हजार रुपयाची बेरर चेक व तसेच शाळेचे संस्थेचे फी रजिस्टर असा एकूण अंदाजे 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज होता. सदर महिला मीठगंज पोलीस चौकी येथे आले असता सदर प्रकार सांगितला असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ स्वतः पोलीस शिपाई 8805 पठाण पोलीस शिपाई 9825 शेख पोलीस शिपाई 99 40 खरात यांनी मिळून हद्दी मधील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर रिक्षा क्रमांक MH12QE8060 प्राप्त करून सदर मालकाचा शोध
घेऊन सदर बॅग प्राप्त करण्यात आली.सदरची बॅग महिला पल्लवी लुंकड यांच्या ताब्यात दिली असून सदर महिलेने खडक पोलीस स्टेशन मधील सर्वांचे आभार मानले आहेत….
सविनय सादर
(गिरीजा म्हस्के)
सहा.पोलिस निरीक्षक
खडक पोलिस स्टेशन
जन हक्क times pune
आरती बाबर
पुणे




