अट्टल घरफोडी करणाऱ्या सराईत चोरांना गुन्हे शाखा युनिट 3 कडून अटक
दिनांक 24/ 4/2023 रोजी गुन्हे शाखा युनिटी सहाय्यक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर यांना बातमी मिळाली की ,पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार नामे जयंत उर्फ येड्या उर्फ जेडी गोवर्धन गायकवाड वय वर्ष 34 राहणार आंबेडकर वसाहत डीपी रोड सुरज प्रोविजन स्टोअर शेजारी औंध पुणे हा भूमकर चौक नरे पुणे येथे असल्याची बातमी मिळाल्याने गुन्हेगारास घरफोडीच्या हत्यारांसह ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे एक स्क्रू ड्रायव्हर एक ऍडजेस्टेबलपणा एक लोखंडी छोटी चपटी कटवणे यासारखे घर फोडी साठी उपयुक्त साहित्य त्याच्याकडे मिळाले त्याची सखल चौकशी केली असता त्याने सिंहगड रोड सांगवी तसेच तळेगाव दाभाडे या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी केल्याचे त्याने कबूल केले सदर गुण्यात त्याला अटक करून त्याच्याकडून सुमारे 200 ग्रॅम वजनाचे दागिने (11,00,000 )रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले. सखोल चौकशी केली असता त्याने सिंहगड रोड पोलीसठाणे हद्दीत, एक सांगवी पोलीस ठाणे हद्दीमध्ये, तीन तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एक असे एकूण पाच घरपोडीचे गुण हे त्याने कबूल केले . सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार मा.पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री.रामनाथ पोकळे मा. पोलीस उप. आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री.अमोल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे 1 पुणे शहर श्री.सुनील पवार गुन्हे शाखा युनिट 3 चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.हरी बहिरट पोलीस उपनिरीक्षक अजित कुमार पाटील ,पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार संतोष शिरसागर ,राजेंद्र मारणे ,शरद वाकसे ,किरण पवार ,सुजित पवार ,संजीव कळंबे ,ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे ,सतीश कचराळे ,प्रकाश कट्टे ,साईनाथ पाटील, प्रताप पडवळ ,सोनम नेवसे .भाग्यश्री वाघमारे, यांचे पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास अजित कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा युनिट 3 पुणे शहर हे करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट तीन पुणे शहर
जन हक्क times पुणे




