नवले पूल परिसरात देहविक्री करणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल; पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : नवले पूल परिसरात देहविक्रय करणाऱ्या आठ महिलांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. महिलांकडून अश्लील हावभाव करण्यात येत असून, या भागातील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Advertisement

नवले पूल परिसरात रस्त्याच्या कडेला थांबून काही महिला देहविक्रय करत आहेत. अश्लील हावभावामुळे या भागातील रहिवाशांना त्रास होत होता. या भागातून जाणाऱ्या सामान्य महिलांना याचा त्रास व्हायचा. रस्त्याच्या कडेला थांबून देहविक्रय करणाऱ्या महिलांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या भागातील रहिवाशांनी सिंहगड रस्ता पोलिसांकडे वेळोवेळी केली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई केली नव्हती. नवले पूलाजवळ सेवा रस्त्यावर वर्दळ जास्त आहे. या भागात गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. पोलिसांकडे नागरिकांनी तक्रार करून पाठपुरावा केला होता. अखेर पोलिसांनी नवले पूल परिसरात थांबणाऱ्या आठ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page