सोलापूरमध्ये मराठा बांधव आक्रमक, शरद पवारांची गाडी अडवली

सोलापूर : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राजकारण चांगलचं तापलं आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक राज्यकर्त्यांच्या घर, कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तर वातावरण अधिकच चिघळले आहे. अशातच सोलापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांचाही ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बार्शीतील टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी रोखली. गाडीच्या समोर आलेल्या आंदोलकांनी एक मराठा, लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. तसेच, मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही केली.
काय म्हणाले शरद पवार?
मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली होती. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर पवारांनी यावेळी माझा पाठींबा आहे, असे म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या.
दरम्यान, शनिवारी (10 ऑगस्ट) भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनाही एका कार्यक्रमात मराठा आंदोलकांनी अडवत आरक्षणासाठी तुम्ही काय केलं, आरक्षण देण्यासाठी इतका वेळ का लागतो, असा जाब विचारला. तसेच, वेळेत आरक्षण दिले तर तुमच्यासोबत नाहीतर तुमच्या विरोधात अशा शब्दांत आंदोलकांनी अशोक चव्हाम यांना इशारा दिला आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




