खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई, दोन गुंडांकडून पिस्तुले केली जप्त

पुणे : सेव्हन लव्हज चौकातील पुलाखाली थांबलेल्या दोघा गुंडांकडून पोलिसांनी २ पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. शुभम अनिल शिंदे (वय २४, रा. महर्षीनगर) आणि सिद्धेश अशोक शिगवन (वय १९, रा. गुलटेकडी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,खडक पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, हवालदार ठवरे, जाधव, ढावरे, चव्हाण हे गस्त घालत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शुभम शिंदे व सिद्धेश शिगवन हे सेव्हज लव्हज चौकात थांबले असून त्यांच्याकडे पिस्तुल आहे.
या माहितीनुसार पोलीस सेव्हन लव्हज चौकात गेले. तेथे थांबलेल्या दोघांना ताब्यात घेतले. शुभम शिंदे याच्याकडे पिस्तुल व २ काडतुसे आणि सिद्धेश शिगवन यांच्याकडे एक पिस्तुल व एक काडतुस मिळून आले. दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे अधिक तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा (पोलीस सह आयुक्त), प्रविण पाटील (अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे), संदिपसिंह गिल, (पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे) व नूतन पवार (सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे शशीकांत चव्हाण (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), शर्मिला सुतार पोलीस निरीक्षक (गुन्हे) (सहाय्यक पोलीस निरीक्षक), अनिल सुरवसे (पोलीस उपनिरीक्षक), प्रल्हाद डोंगळे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, नितीन जाधव, लखन ढावरे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वावळे, समीर भोरडे, भालचंद्र दिवटे, कृष्णा गायकवाड, मयूर काळे, संतोष बारगजे, उमेश महपती, शेखर खराडे, यांच्या पथकाने केली आहे.
जन हक्क टाइम्स पुणे
वार्ताहर :- अकबर शिकलकर




