गुंड निलेश घायवळ प्रकरणातील गुन्ह्यात एकूण ०९ आरोपी विरूध्द ६४५५ पानांचे दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले..!

कोथरूड पोलीस स्टेशन गु.र.नं.२५०/२०२५ भा.न्या.सं.क. १०९, ३५१, ३५२, १८९(१), १८९(२), १८९(४), १९०, १९१(२), १११ (१), १११ (२), १११ (३), १११ (४), १११ (६), १११(७), ६१(२), ४९, ३(५) आर्म अॅक्ट कलम ३ (२५), २७, म.पो.का.क. ३७ (१) (३), १३५, १४२, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट क. ३, ७, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४), ३(५),४ या गुन्ह्यातील फिर्यादी हे दिनांक १७/०९/२०२५ रोजी २३/४० वा. चे सुमा. त्यांचे मित्रासह तिरुपती फॅब्रिकेटर दुकाना समोर, मुठेश्वर मित्र मंडळ चौकाजवळ, कोथरुड, पुणे येथे गप्पा मारत उभे असताना दोन मोटर सायकल वरुन मयुर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मॉन्र्टी व्यास सर्व रा. कोथरुड, पुणे व अनोळखी ०२ व्यक्ती यांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांचे जवळ येवून “तुम्हाला लय माज आला आहे का? कशाला थांबला आहे येथे, हा आमचा एरिया आहे. रोहित ठोक रे यांना” “मय-या खाली उतरुन बघ रे यांना, आज यांची विकेटच टाकू” असे म्हणत फिर्यादी यांना विनाकारण धमकावुन, शिवीगाळ केली. त्याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता मयुर कुंबरे याने फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर पिस्टल मधून गोळी झाडून फिर्यादी यांना गंभीर जखमी केलेबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.
नमुद गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी निलेश घायवळ, मयुर कुंबरे व त्यांचे इतर साथीदार यांनी दिनांक ०६/०९/२०२५ रोजी गणेशोत्सव विसर्जन दिवशी सदर गुन्ह्याचा कट रचला. त्यावेळी निलेश घायवळ याने इतर आरोपींना “कोथरुड भागात आपली दहशत कमी झालेली आहे. आपले टोळीचे वर्चस्व कोथरुड मध्ये वाढविण्यासाठी हमराज चौक, शास्त्रीनगर भागात काही दिवसांत जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवितो आणि केस लागलीतर बाहेर काढतो. असे सांगितले होते. त्याप्रमाणे सदरचा कट पुर्णत्वास नेण्यासाठी आरोपी निलेश घायवळ याने वेपन व आर्थिक सहाय्य देवुन सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नमुद गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपींनी सदरचा गुन्हा स्वतःचे व टोळीचे अर्थिक फायद्याकरिता संघटीत पणे केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने दि.२५/०९/२०२५ रोजी सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. नमुद गुन्हयात आरोपींनी वापरलेले १ पिस्टल, १ रिकामी पुंगळी, आरोपी निलेश घायवळ याचे घरझडतीमध्ये २ जिवंत राऊंड व ४ मोकळया पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. दाखल गुन्हयाचे तपासात एकूण ०९ आरोपींना अटक करण्यात आली असुन ०८ पाहिजे आरोपीत यांचे विरूध्द मा. न्यायालयाकडुन स्टॅडींग वॉरंट प्राप्त करून फरार (उद्घोषणा) घोषित करण्यात आले आहे. फरार आरोपी निलेश घायवळ यास अटक करण्याकरीता Interpol पोलीसांच्या मार्फत
कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. गुन्ह्यातील आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तेची माहिती प्राप्त केली असुन त्याबाबत योग्यती कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. तसेच आरोपी निलेश घायवळ व सचिन घायवळ यांनी कोथरूड भागात ०२ बेकायदेशीर इमारती बांधल्या असुन त्याचेवर कायदेशीर कारवाई होणे कामी पुणे महानगरपालिका यांचेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. गुन्हयात एकूण १२२ साक्षीदार तपासले आहेत तसेच बीएनएसएस १८३ प्रमाणे ०६ साक्षीदार यांचे जबाब नोंद करण्यात आले आहे. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचेकरवी आरोपींची ओळख परेड घेण्यात आली आहे. नमुद गुन्हयाचे तपासात एकूण ०९ अटक आरोपी विरूध्द मा. मोका न्यायालय, शिवाजीनगर पुणे यांचे न्यायालयात दिनांक १२/०१/२०२६ रोजी गुन्हयाचे दोषारोप पत्र सादर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-०१ पुणे शहर श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप खंडणी विरोधी पथक-०१ गुन्हे शाखा पुणे शहर यांच्या सुचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक माळेगाव, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप-निरीक्षक राहुल पवार, पोलीस उप-निरीक्षक विशाल चव्हाण, पोलीस अंमलदार सुनिल राऊत, संतोष डोळस, नितीन काळे व उत्तेकर यांनी केली.




