बडतर्फ मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर; मुंबई हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : एक मोठी बातमी समोर आली आहे. बडतर्फ मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे ला आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोन वर्षांपासून कोठडीत असलेल्या सचिन वाझेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. खंडणी प्रकरणात वाझे यांना अटक करण्यात आली होती. मनसूख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील कैदेमुळे वाझेचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
सचिन वाझे हे गेल्या काही वर्षापासून तुरुंगात होते. त्यांच्यावर उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवल्याचा आणि धमकीचा आरोप आहे. तसेच मन्सुख हिरेन हत्या प्रकरण आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात ते आरोपी आहेत. दरम्यान, खंडणीच्या गुन्ह्यात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना विशेष सीबीआय न्यायालयाने गेल्यावर्षीच जामीन दिला होता. परंतु, इतर दोन गुन्ह्यांत आरोपी असल्याने त्यांचा तुरुंगवास लांबला. मे महिन्यांत त्यांनी पुन्हा अर्ज करून जामीनाची मागणी केली होती. परंतु, तेव्हाही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




