दाऊद अन् बिष्णोईचे फोटो स्टेटसला ठेवणाऱ्या तिघांना बेड्या; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दाऊद इब्राहिम आणि ‘गँगस्टर’ लॉरेन्स बिष्णोईची छायाचित्रे ‘स्टेटस’ म्हणून ठेवणाऱ्या 3 जणांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांच्या न्यायालयाने त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी 3 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपींचा दाऊद इब्राहिमच्या टोळीशी काही संबंध आहे का, याचा तपास करायचा आहे. त्यांनी स्टोरीवर ठेवलेले आक्षेपार्ह स्टेटस कोठे बनवले, त्यांना स्टेटस ठेवण्यास कोणी प्रवृत्त केले अथवा चिथावणी दिली आहे, आणखी कोणाकोणाचा या गुन्ह्यात सहभाग आहे, या बाबींचा तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील भाग्यश्री संचेती (डागळे) यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039




