डबल महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी अभिजीत कटकेच्या घरी आयकर विभागाचा छापा

पुणे : निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात घडामोडींना वेग आला आहे. काल (सोमवारी) पुण्यातील खेड शिवापुर टोल नाक्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 कोटी रूपये पकडले. तर आज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सासरी आयकर विभागाचे छापे पडल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करणार असल्याची चर्चा असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या सासरी म्हणजेच चंद्रकांत कटके यांच्या घरी आयकर विभागाचे छापे पडले आहे. सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या घराची झाडाझडती घेत आहेत.

Advertisement

वाघोली येथील चंद्रकांत कटके यांच्या घरी अधिकारी पोहोचले आहेत. महाराष्ट्राचा हिंदकेसरी पैलवान अभिजीत कटके हा अमोल बालवडकर यांचा मेहुणा आहे. तर कोथरूड मधून विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांना मनवण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट बालवडकर यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिली होती. मात्र, ते ऐकत नसल्याने ही आयकर विभागाने छापा टाकल्याची चर्चा रंगल्या आहे.

हिंदकेसरी अभिजीत कटके कोण आहे?

अभिजीत यापूर्वी एकदा महाराष्ट्र केसरी तर दोनदा उपमहाराष्ट्र केसरी झाला आहे. अभिजीत कटके पुण्यातील शिवरामदादा तालमीचा हा पैलवान आहे. अभिजीतने 2015 मध्ये तरुण महाराष्ट्राचा दर्जा प्राप्त केला. तर अभिजीतने 2016 मध्ये ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले असते.

संपादक – आरतीताई बाबर 8830914142
उपसंपादक – अकबरजी शिकलकर 8625870039

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page